एकच चूंक

Started by Ajit Paralkar, November 27, 2012, 07:17:05 PM

Previous topic - Next topic

Ajit Paralkar

एकच चूंक
तू कधी आरश्यापुढे उभी राहिलीस
तर तुझे तुलाच कोडे उमगेल
तुझ्याभोवती भुंगे कां फिरतात
त्याचे खरे कारण तुला समजेल

तुला घडवताना त्या विधात्याला
रतीची प्रतिकृती असेल आठवली
सौदर्यांची जगातली सर्व परिमाणे
सगळी त्याने तुझ्यात साठवली

डोळ्यांत मद्ध्याची मादकता अन
ओठांत मधाचा साठा उधळला
बोलण्यात सप्तसुरांची सुरावट अन
हंसण्यात धारदार चाकू पाजळला

जे जे सुंदर त्याला दिसले
ते ते त्याने तुला बहाल केले
आणि तरुणांवर राज्य करायला
तुला त्याने भूतळी पाठवले

त्याची फक्त एकंच चूक झाली
तो विसरला की समजून केली
हृदयातील प्रेमाची चव त्याने
गोड नाही थोडी तिखटच केली

कवी ....अजित परळकर 

MK ADMIN

Vinanti : Krupaya kaviteche title suddha marathi madhye asave....
I am editing this time, request you to take care in future.

Enjoy MK :)

Shrikant R. Deshmane

atishay sundar..
khup aavadli...
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]


प्रशांत नागरगोजे

kudarat ne banaya hoga,
badi fursat se tuze mere yaar..

awadali kavita

shubhangi nar


Anish sheikh

Khup chan , avadli ho bhau mala,