ढगातली नाती..

Started by Rohit Dhage, November 29, 2012, 12:35:20 AM

Previous topic - Next topic

Rohit Dhage


का कुणास ठाऊक
पण काही वाटलंच नाही मला
तुझ्या लग्नाची बातमी
उडत उडत आलेली
अन तशीच उडत गेलेली
कुठेही न शिवता..
२ वर्षांचा लेखाजोखा
२ क्षणात संपलेला..,
इतकी उथळ नाती...
विट आलाय आता
हृदयात जाणारी कंपनं,
हृदयातच सामावणारी नाहीत राहिली आता
सगळं क्षणिक वाटतं आता..
नाराज.. नाराज तर तसाही नाहीये मी
फक्त हताश झालोय थोडा,
या ढगातल्या नात्यांशी..
मान खाली अन मुसक्या बांधाव्यात आता
अन फिरावं गोल गोल
कुणाशी न देणं घेणं
फक्त जात्यातलं जगणं
फक्त जात्यातलं जगणं..

- रोहित

Shrikant R. Deshmane

हृदयात जाणारी कंपनं,
हृदयातच सामावणारी नाहीत राहिली आता
सगळं क्षणिक वाटतं आता..
नाराज.. नाराज तर तसाही नाहीये मी
फक्त हताश झालोय थोडा,
या ढगातल्या नात्यांशी..
मान खाली अन मुसक्या बांधाव्यात आता
अन फिरावं गोल गोल
कुणाशी न देणं घेणं
फक्त जात्यातलं जगणं..

atishay surekh rohitji..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Rohit Dhage