सुंदर प्रेम कहाणी

Started by pratik sonune, November 30, 2012, 10:30:38 PM

Previous topic - Next topic

pratik sonune

सुंदर प्रेम कहाणी..♥♥♥♥♥♥
रोज सकाळी बरोबर आठ वाजता मि. जॉन माझ्या स्टोअरमधे येतात. ते न चुकता रोज गुलाबाची ताजी फुले वीकत घेतात. तसेच माझ्या स्टोअरमधे मीळणारे काही मोजकेच पण ताजे खाद्य पदार्थ वीकत घेतात.बरोबर साडे आठ वाजता स्टोअरमधुन बाहेर पडतात. गेली पांच वर्षे त्यांचा हा उपक्रम चालु आहे. उन असो, पाऊस असो, वारा असो, थंडी असो, बर्फ असो, त्यांच्या या प्रोग्रॅम मधे खंड पडलेला नाही. मधे त्यांची तब्येतबरी नव्हती तरी सुध्धा ते नीयमीतपणे येत होते. ते रोज गुलाबाची फुले घेतातम्हणजे नक्कीच आपल्या बायकोसाठी घेत असणार! त्यांचे त्यांच्या बायकोवर फारच प्रेम दीसते!
एक दीवशी जरा मोकळा वेळ होता तेव्हा मी जॉन साहेबांशी संवाद साधायचा प्रयत्न केला. तसे ते फारमीतभाषी. कधी कोणाशी फारसे बोलत नाहीत. पण त्यांचा मुड पण जरा वेगळा दीसत होता.
" फुले कोणासाठी? बायकोसाठी वाटत!" मी प्रश्न केला
" बायको?" जॉनसाहेब क्षणभर गोंधळले व म्हणाले, " नाही! मी अनमॅरीड आहे!"
"मघ ही फुले?" मी विचारले
" ती माझ्या मैत्रिणीसाठी!" जॉनसाहेब उत्तरले.
"मैत्रीण?" मी जरा खोचकसारखे विचारले.
" शाळेमधे असताना आमचे प्रेम प्रकरण होते. पण त्याला बरीच वर्षे झाली. मग तिचे लग्न झाले आणि मी अनमॅरीड राहिलो." सहज सांगावे तसे जॉनसाहबांनी सांगीतले.
"तुमची मैत्रीण इथेच असते कां?" मी विचारले
"हो इथेच असते, हॉस्पीटलमधे!" जॉनसाहेब म्हणाले.
"हॉस्पीटलमधे?" मी म्हणालो.
"होय! गेली दहा वर्षे ती हॉस्पीटलमधे आहे. कार ऍक्सीडेन्टमधे तिचा नवरा गेला. तिच्या डोक्याला जबरदस्त मार लागला. त्यामुळे ती स्मृती हरवुनबसली आहे. कोणाला ओळखत सुध्धा नाही. मी रोज सकाळी बरोबर नऊ वाजता तिच्याबरोबर ब्रेकफास्ट घेतो." जॉनसाहेब म्हणाले
" पण ती तुम्हाला तरी ओळखते कां?"मी जॉनसाहेबांना विचारले
"बहुतकरुन नसावी!" जॉनसाहेब म्हणाले. "तिला एव्हडेच ठाऊक आहे की रोज सकाळी नऊ वाजता कोणीतरी एकमाणुस तिच्याबरोबर ब्रेकफास्टघ्यायला येतो. याची तिला येव्हडी सवय झाली आहे की जर एखाद्या दीवशीमी गेलो नाही तर ती दीवसभर उपाशी बसते."
जॉनसाहेबांच्या सामानाची पीशवी त्यांच्या हातात देताना मी त्यांना विचारले, " पण तिचे तुमच्यावर प्रेम आहे कां?"
"ठाऊक नाही!" सामानाची पीशवी उचलताना जॉन साहेब म्हणाले, "पण माझे तिच्यावर प्रेम आहे ना!"
वयाच्या सत्तरीत सुध्धा आपल्या प्रेयसीवर निरपेक्षपणे प्रेम करणार्याल जॉनसाहेबांना बघुन माझे डोळे भरुन आले. माझे आश्रृ आनंदाचे होते, कृतज्ञतेचे होते की आणखी कशाचे होते माझी मलाच कळले नाही...

mukta kulkarni



Pratej10

khoop chan :)

Hope everyone loves their loved one the way Mr. John loved :)

sweetsunita66

 ह्यालाच प्रेम म्हणतात  :) :) :)

vinod.shirodkar111



kishor salve

तिला सहज विचारलं,
माझ्यावाचून जगशील का..?
ती म्हणाली माशाला विचार,
पाण्यावाचून राहशील का..?
हसून पुन्हा तिला विचारलं,
मला सोडून कधी जाशील का..?
ती म्हणाली कळीला विचार,
देठा वाचून फुलशील का..?
गंमत म्हणून तिला विचारलं,
तू माझ्यावर खरचं प्रेम करतेस का..?
ती म्हणाली, पाणावलेल्या डोळ्यांनी,
नदीला विचार ती उगाचं सागराकडे
धावते
का..?
..

pratik sonune


sheetal solavande

khup sundar prem  khani, ekhadych man olkhayla, janayla shikvinari,
mage valun phanari njar khup kahi bolun jate, punha bhet hoil ki nahi asa prashn vicharte,good