न झाला धीर मला ...

Started by Sadhanaa, December 01, 2012, 11:51:31 PM

Previous topic - Next topic

Sadhanaa

न झाला धीर मला...

न झाला धीर मला
         त्या सुंदरीशी बोलण्याचा
म्हणुनि अवलंबिला मार्ग
         प्रेम पत्र तो लिहिण्याचा।
अवेळी त्या न मिळाला
         तुकडा एकही कागदाचा
अखेरीस केला उपयोग
        खिशा मधल्या नोटेचा।
स्मित केले तिने एकदा
         मजकुर वाचुन नोटेवरचा
घडी केली नोटेची अन्
         उघडला कप्पा मनीबॅगचा।
ठेवूनि नोट पर्समध्ये
        बोले धीर करून मनाचा
नोटेवर असे लिहू नये
        हा अपमान आहे नोटेचा।।


रविंद्र बेंद्रे
ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://ravindrabendre.blogspot.com/2012/11/blog-post_27.html