पाउस..

Started by Rohit Dhage, December 02, 2012, 01:52:52 AM

Previous topic - Next topic

Rohit Dhage


पावसाचा आवाज
पानांवर पडणारी टपटप
गडगडणारे आभाळ.....
कुणाशीही काहीही न देणं घेणं या पावसाचं
तरी काळजावर झिरपणारं, पानांवरून ओघाळणारं पाणी....
कुठल्याश्या जुनाट आठवणी..
तिनं यावेळी गायलेली गाणी..
सारं सारं अगतिक...
दाराच्या कोयंडयावर बसलेला मी
हातभर अंतरावरचं चिंचेचं झाड
पक्ष्यांची फडफड, कसलीशी धडपड
आणि पाउस........
पीत राहायचं हे बाहेरचं गीत,
मन भरून वाहिपर्यंत..
कुणी सांगावं..
पुढचा पाउस माझा असेल.. नसेल
हे दोन क्षण ओंजळीत साठवून घेणार मी
मनाचा तो ही कोपरा भिजेपर्यंत...
माझ्या पुढच्या पावसापर्यंत..


- रोहित

केदार मेहेंदळे


Rohit Dhage

Thanks Kedar saheb......  8)   :D