एक आस तुझ्या परतून येण्याची

Started by ankush.sonavane, December 03, 2012, 10:40:42 AM

Previous topic - Next topic

ankush.sonavane

 [font=]एक आस तुझ्या परतून येण्याची [/font]


अजून हि आशा आहे तूझ्या परतून येण्याची
अमावशेच्या रात्रीमध्ये चांदणीच्या प्रकाशाची.
भिती वाटते  मजला रखरखत्या सूर्याची
सोबत नसताना सावली तुझ्या छायेची.
अजून हि आशा आहे तूझ्या परतून येण्याची...

        पण मला वाटते तू परतून येणार नाही
        पुनवेचे चांदण माझ्या अंगणी कधी फुलणार नाही
        त्या दिवशी जाताना मागे वळून पहिलेच नाही
        कठोर तुझ्या मनाला माझे प्रेम कळलच नाही

मी एक प्रेम वेडा तुझ्याच पाठमोऱ्या छायेकडे पाहत होतो
नजरेआड होता मृगजळात तुला शोधात होतो
हाती न येणाऱ्या मृगजळाच्या मागे मी जात होतो
मलाच माहित नाही मी कोणत्या वाटेवर  चालत होतो

        तुला शोधता शोधता मी इतका दूर निघून गेलो होतो
        मागे वळून पहिले तर मी एकटाच राहिलो होतो
        जाणिव झाली जेंव्हा मला एकटेपणाची
        शिक्षा मिळाली  मजला  तुझ्यावरती केलेल्या प्रेमाची.

पण तरीही का वाटते तू परतून येशील
अमावशेच्या  दिवशी अंगणी चांदण   फुलवशील
जशी ओढ आहे चंद्राला  चांदणीची
अजून हि आशा आहे तूझ्या परतून येण्याची...

                                                 अंकुश सोनावणे