मी तुझ्यापासून खुप दूर निघून जाणार आहे....

Started by Ankush S. Navghare, Palghar, December 03, 2012, 08:30:43 PM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar


एक दोन क्षण आपण एकत्र जगलो
पण अनेक नात्यांत अलगद गुंतलो
हा सर्व गुंता सोडवून जाणार आहे
मी तुझ्यापासून खुप दूर निघून जाणार आहे...!!१!!

आता माझ्या मागे उरणार फक्त
माझ्या चांगल्या वाईट आठवणी
तुझ्या हृदयात फक्त माझ्या
आठवणीच ठेऊन जाणार आहे.
मी तुझ्यापासून खुप दूर निघून जाणार आहे...!!२!!

पण मी जेव्हा जाणार तेव्हा
मी एकटाच जाणार नाही
जाता जाता तुलाही माझ्या
हृदयात घेऊन जाणार आहे
मी तुझ्यापासून खुप दूर निघून जाणार आहे...!!३!!

माझे डोळे रडतील पण
त्यांतून अश्रू वाहणार नाहीत
कारण माझ्या डोळ्यांतले अश्रू
आता तुझ्या डोळ्यांतून वाहणार आहे
मी तुझ्यापासून खुप दूर निघून जाणार आहे...!!४!!

माझ्या जाण्याने तुझ्या मनातले
सर्व गैरसमज मी दूर करणार आहे
माझ्या अस्तित्वात काही गैर नव्हते
हे मी गेल्यावर तुला समजणार आहे
मी तुझ्यापासून खुप दूर निघून जाणार आहे...!!५!!

माझ्या सारखे अजून कितीतरी
तुझ्या जीवनात परत परत येतील
पण त्यांत मी नाही हि खंत
तुला पदोपदी सतावणार आहे
मी तुझ्यापासून खुप दूर निघून जाणार आहे...!!६!!

ह्या जगात काहीच स्थिर नसून
सारे काही बदलू शकते
माझ्या अचानक जाण्याने
नियतीचे हे कठोर सत्य तुला उमगणार आहे
मी तुझ्यापासून खुप दूर निघून जाणार आहे...!!७!!

मी तुझ्यापासून दूर असलो तरीही
सदैव तुझ्यातच असणार आहे
तरीही कधी तुझ्या सुखात तर कधी तुझ्या दुखात
माझी कमतरता नेहमीच तुला जाणवणार आहे
मी तुझ्यापासून खुप दूर निघून जाणार आहे
तुझे जीवन तुझे जग कायमचे सोडून जाणार आहे.... ...!!८!!

.... प्राजुन्कुश
.... Prajunkush.

केदार मेहेंदळे



Ankush S. Navghare, Palghar



Ankush S. Navghare, Palghar


Madhura Kulkarni

जातो जेव्हा तुला सोडुनिया दूर
भटकते जीवन गाणे होऊनी बेसूर
मनातल्या भावनांना जाळतो मी पुन्हा पुन्हा
मग त्याचाच साठतो मनामध्ये धूर.....

आठवणी तुझ्या धरतात फेर
वादळ भावनांचे अन आसवांचा पूर
घेतो पत्र लिहावया होऊन आतुर,
शाई आतुनिया जाते, हरवतो मजकूर.....

टाळले जरी किती जरी केले नामंजूर
नकळत उमलतो मनी प्रीतीचा अंकुर
सहन होत नाही सखे विरह तुझा आता   
तुला भेटण्याची लागली हुरहूर ......


खूप छान कविता आहे दादा.....मस्त.


Ankush S. Navghare, Palghar

Je hrudayatun ale tech lihile...
Asmitraj ji ... Khup abhar manapasun...

Tumche nav chan ahe...