का तु माझ्यापासून दूर निघून जात आहेस ???

Started by Ankush S. Navghare, Palghar, December 05, 2012, 12:34:04 AM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

का तु माझ्यापासून दूर निघून जात आहेस
डोळ्यांत विरहाचे अश्रू ठेऊन जात आहेस

तु माझ्या जीवनात येऊन माझे जीवन फुलविले
प्रेमाच्या अनेक सुंदर रंगांनी सजविले
आता फक्त दुखद आठवणींचे क्लेश ठेऊन जात आहेस
का तु माझ्यापासून दूर निघून जात आहेस...!!१!!

तु माझ्या जीवनात गुलाबाचे फुल बनून आलीस
स्वतः ऊन पाऊस सोसून सुगंध देत राहिलीस
आता मात्र विरहाचे काटे मनात ठेऊन जात आहेस
का तु माझ्यापासून दूर निघून जात आहेस...!!२!!

ती आपली पहिली भेट आणि मग तो सर्व प्रेमाचा प्रवास
त्याच्यानेच बहरला आहे माझ्या जीवनाचा प्रत्येक श्वास
माझ्या हृदयातील तुझ्या आठवणींना दुखात लोटून जात आहेस
का तु माझ्यापासून दूर निघून जात आहेस...!!३!!

सुरवातीला आपल्या नात्यात मैत्रीचाच आभास होता
पण नंतर उमगले तो एक वेगळा सहवास होता
त्या सहवासाला नाव न देताच मागे फिरून जात आहेस
का तु माझ्यापासून दूर निघून जात आहेस...!!४!!

मैत्रीचे रुपांतर नात्यात होत नसते काय??
कुठच्याही नात्याला मैत्रीचीच साथ नसते काय??
मग का तु त्या निष्पाप नात्याची साथ सोडून जात आहेस
का तु माझ्यापासून दूर निघून जात आहेस...!!५!!

नकळत तुझ्या मनाने माझ्या मनाचा वेध घेतला होता
नकळत का होईना मी पण प्रेमाचा सुंदर महाल सजविला होता
माझ्या मनात जे होते तुझ्याही मनात तेच होते
मग का त्या महालाची रखरांगोळी करून जात आहेस
का तु माझ्यापासून दूर निघून जात आहेस...!!६!!

प्रेम करणं हा गुन्हा नाही
पण प्रेम लपवण हा गुन्हा आहे
एखाद्याचा दोष नसताना त्याला रडवण हा गुन्हा आहे
तूच जन्माला घातलेल्या प्रीतीच्या बाळाला
का तु वाऱ्यावर सोडून जात आहेस
का तु माझ्यापासून दूर निघून जात आहेस...!!७!!

जसे प्रेम मी केले तसे तुहि ते केले आहेस
माझ्या एकाकी हृदयाला तुझ्या हृदयाशी जोडले आहेस
आता वेळ आल्यावर का नाकारून जात आहेस
का तु माझ्यापासून दूर निघून जात आहेस...!!८!!

प्रेम केलेस तर निभवायला शिकले पाहिजे
निभवायला शिकले तर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे
खऱ्या प्रेमाला का तु अशी दुखाऊन जात आहेस
का तु माझ्यापासून दूर निघून जात आहेस...!!९!!

जर तुझ्यात हिम्मत नव्हती तर प्रेम का केलेस तु
एका निष्पाप जीवाला निष्कारण का दुखावलेस तु
जरी वरवर भासावलेस की तुला काही माहित नाही
तरी नकळत तुझ्या प्रेमाचे ठसे मागे ठेऊन जात आहेस
का तु माझ्यापासून दूर निघून जात आहेस...
का तु माझ्यापासून दूर निघून जात आहेस...!!१०!!

.... प्राजुन्कुश
.... Prajunkush.
     



Ankush S. Navghare, Palghar


Madhura Kulkarni

श्वासागणिक आठवणीही सोडून जातायत आता
असा एकाकी करुनी मला का तू जात आहेस?
आधीच मेलेल्या जीवाला का मारून जात आहेस?

छान.

Ankush S. Navghare, Palghar

Madhura ji tumhi lihilelya kavitechya oli vachun mla ase vatate ki mazya kavitecha shevat tumchyach hatun vhayla hava hota...

Khup chan shabda an tyanchi gumfan..

... Khup abhar agadi manapasun.

Madhura Kulkarni


Madhura ji tumhi lihilelya kavitechya oli vachun mla ase vatate ki mazya kavitecha shevat tumchyach hatun vhayla hava hota...

Khup chan shabda an tyanchi gumfan..

... Khup abhar agadi manapasun.

धन्यवाद दादा. पण अरे मी आवड म्हणून करते कविता.....पण तुझ्या कविता अनुभवाने परिपूर्ण आहेत. म्हणूनच बहुतेक तुझी कविता खूप प्रभावी वाटते.
शब्द, यमक आणि मात्रा या गोष्टींच महत्त्व फक्त कवितेत असत. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे भावना......ज्या तू प्रत्यक्ष अनुभवल्याने तू कविता लिहिलीस.
तुला कवी बनवल हि एक चांगली गोष्ट केली 'तिने'; त्याचमुळे तर अश्या दर्जेदार कविता वाचायला मिळतात आम्हाला.

आणि Prajunkush दादा,  अश्या चांगल्या कविता लिहित रहा.


Ankush S. Navghare, Palghar