नको रडू इथे,इथे कोणी नाही

Started by Mandar Bapat, December 06, 2012, 03:19:37 PM

Previous topic - Next topic

Mandar Bapat

नको रडू इथे,इथे कोणी नाही
अश्रुना तुझा इथे मान नाही.......
पुरे तुझे दुखणे गाऱ्हाणे आतांही
ऐकाया  इथे कोणा कान नाही.......

हसाया तुला मिळतील सोबती 
लागेल रडाया तुला इथे तू एकटाच आहे......
कोवळे हृदय तुझे नाही ते दगडी
नाही दुसरे कारण एक ते हेच आहे.........

नको संपवू हि आसवे अशी ही
भासेल गरज त्याची पुढेही काही.....
दुखासोबत अन सुख येती दारी
सोबत तुझा असुदे आनंदाश्रूही काही.......

पुसून  डोळे बघ असे सभोवती
स्वच्छ आकाश अन तशा दिशा दाही...
पसरवूनी  त्याचे पुढे असे हात  दोन्ही
समोर उभे सुख तुझी वाट पाही......

नको रडू इथे,इथे कोणी नाही
अश्रुना तुझा इथे मान नाही.......

                                    .....मंदार बापट

केदार मेहेंदळे

chan gajhal..... fakt dusryaa kadavyaatali dusari ol barobar layit jaat nahiye...

Mandar Bapat


केदार मेहेंदळे