द्या हो द्या नारायणा याचे उत्तर द्या...

Started by abhishek.dhapare, December 06, 2012, 06:37:53 PM

Previous topic - Next topic

abhishek.dhapare

मला पाहून कोणी हसतात असे,
विश्वाच्या या निर्मितीचे गूढ कसे...?

सारे काही असुनी हाती काही नसे,
आभाळाचे देणे तरी जग का त्यास हसे...?

म्हणे मज कुरूप कोणी चंद्रावर डाग जसे,
अन मग चंद्रालाही ही खुळे सुंदरत्व का बहालतसे...?

गोड गुलाबालाही असतात काटे जसे,
सर्यांसारखे असूनही आम्ही वेगळे कसे...?

कुंभार घडविशी मडके सुरेख असे,
त्यात आमचे फुटके मडके,
त्यात आमुचा काय दोष असे...?

आम्ही जरी असू फुलातले फुल गोड जसे,
नियती का त्यास लागलीच कोमेजू देत असे...?

या सृष्टीचे असुनी आम्ही पाहुणे कसे....?
द्या हो द्या नारायणा याचे उत्तर द्या...

सर्व माझा अपंग आणि प्रोगेरिया आणि प्लासिस एम्फसिस झालेल्या म्हणजे पा मधल्या ओरो सारख्या मुलांचा वेदना मला या कवितेत मांडावीशी वाटली....
कृपया सर्वांकडे पसरावा आणि त्या मुलांशी भेदभाव थांबवा,
त्या मुलंना तुमचा दये पेक्षा प्रेमाची गरज आहे...
कृपया विचार करा...

-अभिषेक ढापरे, पुणे
9923092739