कोजागिरी...

Started by abhishek.dhapare, December 06, 2012, 06:41:46 PM

Previous topic - Next topic

abhishek.dhapare

नभ खेळे चांदणहूल
तू तार्यांचे एक फुल...

कवितेचा एक घेऊन झुला,
नकोना रुसू माझा फुला...

तव मुखकमल कसे..?
तव पौर्णिमेच्या चंद्र दिसे...!

तव मनकमल कसे...?
तव कोजागिरीचे क्षीर(दुध) जसे...!
-अभिषेक ढापरे, पुणे.
  ९९२३०९२७३९

केदार मेहेंदळे

chan kavitaa.....

"tav" chyaa aivaji 'tujhe' haa saadhaa shabd jast changalaa watalaa asata.....

abhishek.dhapare

केदार जी आपल्या अभिवादनेबद्दल धन्यवाद...!!!
मी या कवितेत "तव" हा शब्द वापरण्याचं कारण असं आहे कि, तुझा/ तुझे असे शब्द मी तिथे वापरले असते तर ती कविता काव्यालांकारात न मोडता ती कविता म्हणजे एक केवळ प्रेमळ संवाद झाला असता...
आणि "नुसता संवाद" आणि "काव्यालंकारभुषीत संवाद" यात फरक आहे तो दाखवायचा होता....
:)