विराणी

Started by Mangesh Kocharekar, December 07, 2012, 01:36:47 PM

Previous topic - Next topic

Mangesh Kocharekar

     विराणी

झगडलो मनासी परी न मला कळले

अधीर मन माझे कसे तुझ्यावर जडले ?
        तुझ्या निरागस डोळ्यांनी विद्ध मला केले
       नकळत माझे र्हीदय पाहुनी तुज धडधडले
मी साद घालूनिया न ओठ तुझे हलले
हा साधेपणातुझा कि कावा मी समजावा 
        तुज मूक समजुनी मी हलकेच निघुनी गेलो
       परी गुंतले मन रेंगाळले पाठी मागे
रात्री न झोप आली दिवस बुडुनी गेला
कातर मन माझे खिन्नपणे हसले
        दिस निघुनी गेला मन विसरुनी गेले सारे
        परी दिसली सामोरी तू तेव्हा हातात चुडा होता
चार पावले तू चालुनी पुढे गेली
मूक भावना तुझी मज कळून नच आली
       वळून पहिले तू मिश्कील भाव होते
      काळीज कापले तू परी शब्द होते मुके
वेदना मनाला चाटून पार गेली
अन सुकणारी जखम पुन्हा भळाळून  आली

            कोचरेकर मंगेश