तुझे हे वागणे मला मान्य नाही...

Started by Mandar Bapat, December 07, 2012, 01:55:47 PM

Previous topic - Next topic

Mandar Bapat

कशाला जोडतो  तुझे  हाथ दोन्ही
तुझे हे वागणे मला मान्य नाही...
अनेक स्तोत्र मंत्र तुझा मुखी तरीही
मला हृदयी तुझा कुठे स्थान नाही......

व्यर्ज  कर कांदा नको खाऊ काही
असे कधीच मी कुणालाही म्हणत नाही...
मी तर प्रसन्न बस इवल्याने होतो
दगड नाही मला जो माणसात पाहतो... .

मी आहे   तुझ्यात,दुसरयात ही  मी
सगळ्या जीवमात्रात वसलो आहे मी...
नको जाऊ पंढरी नको देहू  काशी
वेध घे जरा मी आहे रे तुझापाशी...

तुझपाशी ठेव तुझे नाना गार्हाणे
बस स्मर मला एकदा स्वच्छ मनाने...
नको तुझा लाडू अन मोदक मलाई
खूप झाली माझी आता ही वरची कमाई....

आता बंद कर मागणे "अल्ला के नामपे"
अर्धे आयुष्य तुझे याचातच संपे....
चालव मनगट हे सांगाया आलो.
आता सांग साऱ्या मी प्रसन्न झालो......

कशाला जोडतो  तुझे  हाथ दोन्ही
तुझे हे वागणे मला मान्य नाही...

                                            .....मंदार बापट

केदार मेहेंदळे



Madhura Kulkarni

छान आहे कविता. आशयहि आवडला.
पण सल्ला देण्याच्या माझ्या सवयीप्रमाणे ; एक सुधारणा......

"अनेक स्तोत्र मंत्र तुझा मुखी तरीही
मला हृदयी तुझा कुठे स्थान नाही......"
या ओळींमध्ये 'तुझा' या शब्दाऐवजी 'तुझ्या' असा शब्द यायला हवा होता.

Mandar Bapat



supriya shinde


Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]