चंद्र फुलांना सांगतो तुझी न माझी कथा

Started by देवेंद्र, December 07, 2012, 03:16:28 PM

Previous topic - Next topic

देवेंद्र

चंद्र, फुलांना सांगतो तुझी न माझी कथा
चांदण्या मिटती लोचन अपुले शब्द शब्द ऐकता

कथिला त्याने तेव्हा स्वप्नांचा आठव मोठा
ती सांजवेळही जेव्हा मोगरा टपोर फुलला होता

निळाईतल अथांग पाणी काठावरची तरंग गाणी
निरोप देता रवी धरेला क्षितिजावरची मुक विराणी

पावसाचा रंग गहिरा धुंद बटांचा आवेग वेगळा
आभाळाचा श्वास मोकळा तुझ्या हाताचा स्पर्श बोलका

स्वप्न रंगात रंगलेली रात्र न रात्र मंतरलेली
मौक्तीकाची सुरेख पंक्ती ओष्ठद्वयात उमललेली

त्या साऱ्या शब्दांची कहाणी तुझ्या भेटीची प्रत्येक निशाणी
हर एक याद अधीर दिवाणी शब्दाविनाही जी फुलून गेली

मिटुनी लोचन शशी बोलला का असा हा डाव रंगला
कोणासाठी कोणी मांडीला कोण हरला कोणी जिंकिला

रातराणी मग हळूच हसली पानांमध्ये जुई मुसमुसली
टिपून आसव ती म्हणाली प्रीतीची ही रीत निराळी

        देवेंद्र


Shrikant R. Deshmane

chandra- fulana nakkich aavdel hi katha..
chan prayatna devendraji..
best luck 4 future..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]


देवेंद्र

Shrikantji, ek swalpawiram rahila ani arthach badalala, me modify kelay Chandra natar "," takalay  :)