मुंबई माझी

Started by Mangesh Kocharekar, December 07, 2012, 03:53:40 PM

Previous topic - Next topic

Mangesh Kocharekar


      मुंबई माझी

म्हणाल मुंबई माझी जोवर मिळेल उत्सवासाठी हप्ता

मुतारीच्या कोपर्यात चालेल बेट अन रात्रभर चालेल गुत्ता
   नाक्यावर असेल तुमचेच राज्य रोजच मिळेल भत्ता
   वेळ असेल तेव्हा कोठलीही गल्ली कसली आल्याय नितीमत्ता
म्हणाल मुंबई माझी जोवर असेल सुटायची हमी
जमीन कुणीही करो असो दोन व त्याचा डमी
     सु ऱ्या - बिर्या आत्ता बंद आत्ता घोडाच येतो कामी
    खोक्या  शिवाय सुपारी कसली कुणी बी असो धनी
म्हणाल मुंबई माझी जोवर असेल अंगात धम्मक
चामडी सुर्कुतली कि पोरही म्हणतात चाल सटक
     अंगात रग  असेपर्यंत असतो डोळ्यांचा वचक
    मुल बापाला विचारात नाही जर बाप जगात असेल फुकट
म्हणाल मुंबई माझी जोवर असेल शब्दास किंमत
सभेसाठी माणस पुरवण्याची असेल धमक
    सुटला होल्ड तर समजा झालात बोल्ड
   तुमच स्थान टिकवायला व्हाव लागेल दादा मोल्ड
                 कोचरेकर मंगेश