खून झालाय कोणाच्या तरी हाताने...

Started by tanmay20, December 08, 2012, 10:18:23 AM

Previous topic - Next topic

tanmay20

छडी उचलली बाईने , म्हणाली लिहा कविता डोक्याने
निळा आंबा पांढरा पेरू खाऊन पोट भरिले , असं लिहिलं बोक्याने
हे ऐकून सारे हसले , म्हणाले काय लिहिले हे मुर्खाने
" अरे मुर्खा , आंबा हा पिवळाच पेरू हे हिरवंच "  म्हणाली बाई रागाने
" का ? हे असंच का ? तसं का नाही ? " विचारलं त्याने हट्टाने
म्हणाल्या बाई , " हे असंच लिहिलंस , तरच पास होशील चांगल्या मार्काने "
खरं तर त्यादिवशी कल्पनाशक्तीचा खून झाला , कोणाच्या तरी हाताने .....


ब्रश उचलला सरांनी , म्हणाले काढा चित्र मनाने
त्रिकोणी सूर्य , उडणारे मासे , सहा पायी हत्ती , मस्त सृष्टी रंगवली बोक्याने
हे बघून सारे हसले , म्हणाले पुन्हा माती खाल्ली ह्या मुर्खाने
" अरे बावळट , सूर्य गोलंच , मासे पाण्यातच , हत्तीला चारच पाय "  म्हणाले सर द्वेषाने
" कोणी सांगितला ? माझ्या चित्रात हे असंच "  म्हणाला बोक्या जिद्दीने
मग काय ? हात पुढे करताच बसले दोन फटके सरांच्या पट्टीने
खरं तर , त्या दिवशी पुन्हा कल्पनाशक्तीचा खून झाला , कोणाच्या तरी हाताने .....

वीस वर्षांनी सर आणि बाई , अचानक भेटले जात असता रस्त्याने
" अरे बोक्या तू ? काय चाललंय सध्या ? " विचारलं त्यांनी आपुलकीने
" काय चालणार ? तीच पाच हजारची नोकरी , तेच चाळीतलं घर
तोच लोकलच्या चौथ्या सीट वर बसून प्रवास "  म्हणाला बोक्या खजीलपणे
" अरे अरे अरे ! काय हे बोक्या ? काय चाललंय हे ?
थिंक औट ऑफ द बॉक्स , वापर कल्पनाशक्ती , आणि मार भरारी आयुष्यात "  म्हणाली बाई उत्साहाने
बोक्याच्या डोळ्यात अश्रू तरळले , हृदय भरून आले , केविलवाणे शब्द फुटले
" वापरली असती बाई , खरंच वापरली असती, पण त्याच गोष्टीचा तर खून झालाय कोणाच्या तरी हाताने .....खून झालाय कोणाच्या तरी हाताने ".

                                                                                                                                                                             .......तन्मय सिंगासने

केदार मेहेंदळे


विक्रांत

मला वाटते पहिल्या दोन कडव्यात  कविता संपायला हवी होती .३ रे कडवे ओढल्या सारखे वाटते .दोन सुंदर निळे आंबे खाल्यावर नेहमीचा रटाळ पिवळा तिसरा आंबा ... :)