भंगले स्वप्न आणि ...

Started by Sadhanaa, December 08, 2012, 01:35:41 PM

Previous topic - Next topic

Sadhanaa

भंगले स्वप्न आणि
भंगली जीवन कृति
रंगले ते मन आणि
उजळून आल्या स्मृति।

गोड वेडे स्वप्न माझे
अंतरी जे जोपासले
काळाच्या एक लहरीने
आज ते भंगून गेले ।

तारुण्याच्या ऐन उमेदी
बहरली प्रीत होती
सुखमध्ये डुंबत होतो
प्रिय सखीच्या संगती।

दुर्लक्षिले दैव तेव्हां
जवळ ती असताना
भयाणता त्याची कळली
जवळ ती नसताना ।

मांडलेल्या संसार डावी
तत्पर ती सदा होती
आतां फक्त राहिल्या
संसाराच्या धुंद स्मृति ।

येत असेल तिला कां
आठवण अपुल्या प्रीतिची
ओढ मनी असेल कां
पुन्हां  मज भेटण्याची ।

कि हसते मना मध्यें
पाहून भंगलेली कृतीं
आनंदते मनीं आणिं
पाहुन विझलेली ज्योती ।।

रविंद्र बेंद्रे

ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://ravindrabendre.blogspot.com/2012/12/blog-post.html

Ankush S. Navghare, Palghar

दुर्लक्षिले दैव तेव्हां
जवळ ती असताना
भयाणता त्याची कळली
जवळ ती नसताना ।
Sadhnaji... He agadi khare ahe. Chan kavita ahe.