आणखी काय हवंय आईला....

Started by टिंग्याची आई..., December 10, 2012, 02:48:51 PM

Previous topic - Next topic

टिंग्याची आई...


गोड गोड साखर झोपेत...
आईला उठायचा अगदीच कंटाळा आलेला असताना...
डोळे उघडताच तू दिलेली एक क्युटशी स्माईल...
आणखी काय हवंय आईला... दिवसाची  सुरुवात करायला...

रोजच सकाळी उंबर्यावर....
ऑफिससाठी आईचा पाय निघता निघत नसताना...
Bye Bye म्हणत.. तू दिलेला एक गोड गोड पापा...
आणखी काय हवंय आईला.... संध्याकाळची वाट पाहत ऑफिसला निघायला...

नेहमीच्याच कामाच्या टेन्शन मध्ये...
मधूनच desktop वरचा तुझा फोटो न्याहाळत असताना...
फोनवर तुझ... "आई लवकर ये ना ग.." अस सांगण....
आणखी काय हवंय आईला.... तुझ्याविना दिवस कसातरी पुढे ढकलायला....

दिवसभर वेडी तुझ्याच आठवणीत राहून...
ऑफिसमधून येताना तुला भेटायला अधीर झालेली असताना...
दार उघडताच तू मारलेली घट्ट मिठी.....
आणखी काय हवंय आईला.... दिवसभराचा शीण विसरायला...

चिऊ काऊशी गप्पा मारत...
मऊ मऊ वरण भात तुला भरवत असताना...
तू भरवलेला एक चिमुकला घास....
आणखी काय हवंय बाळा... आईच पोट भरायला..

तुला गाणी-गोष्टी ऐकवत.. तुझ्याशी खेळून...
तुझ्या मागे धाऊन धाऊन आई दमलेली असताना....
खोट खोटच तिला थोपटणारा  तू....
आणखी काय हवंय आईला... रात्री शांत झोप लागायला....

कधी बनशी छोटा भीम तर कधी खट्याळ कृष्ण...
सारखा सारखा त्रास देशी.. आजीला काम करत असताना....
अशा या तुझ्या रोजच नवनवीन लीला...
आणखी काय हवंय तुझ्या मम्माईला... तुझ्यावर गोड गोड कविता लिहायला.. :-)

- टिंग्याची आई...(Shailja)
टिंग्याने dictionary ला बहाल केलेला नवीन शब्द --> मम्माई = मम्मा + आई

Inspiration : परवा सकाळी उठल्या उठल्या टिंग्याने दिलेली Cuuuuuute स्माईल... :)
http://tingyaachiaai.blogspot.com



Shrikant R. Deshmane

apratim kavita...shailja
khupch chan...
kaljala bhidli hi kavita
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]


PRASAD NADKARNI