जीवनाचे सोने

Started by amit kulkarmi, December 10, 2012, 06:14:15 PM

Previous topic - Next topic

amit kulkarmi

माझ  आयुष्य मला  जगायचंय
हे  जीवन  माझ मलाच घडवायचाय
खडतर वाटेवरच शिखर मला बोलावताय
त्या शिखराच्या हाकेला ओ मला द्यायचंय
महासागरच्या पलीकडे मला जायचंय
त्या सागराला आव्हान मला द्यायचय
आभाळापेक्षा मला मोठ व्हायचय
त्या आकाशाला कुशीत मला घ्यायचय
देवान  दिलेल्या या  जीवनाच मला सोन  करायचं
म्हणूनच मला माझ्या आयुष्याचा लोहार व्हायचंय
मला माझ मी पण शोधायचं
त्यातूनच जगाच्या सामोर मला जायचय
माझ कर्तुत्व मला जगाच्या समोर आणायचंय 
पण त्याला अहंकाराच्या राक्षापासून वाचवायचंय 
                                              - अमित कुलकर्णी

Madhura Kulkarni

#1
Good. पण शेवटच्या ओळीत 'अहंकाराच्या राक्षापासून वाचवायचं' ऐवजी  'अहंकाराच्या  राक्षसापासून वाचायचं' असे हवे होते.


payama