निरोप

Started by swara, December 10, 2012, 08:05:16 PM

Previous topic - Next topic

swara

पावसाच्या प्रत्येक थेंबाने 
ओलिचिंब तू झालीस
अग सावर स्वतःला
बेधुंद किती तू झालीस ?

मिटलेल्या पापण्यात राजकुमाराचे
स्वप्न निशेत पाहिलेस ,
मग मनही  आतुर
त्याचे तूच केलेस

छळतेस  ग किती त्या
तुझ्या राजकुमाराला ,
कधीतरी चांदण्या रात्री  भेट तोही
तुझ्या आठवणीत बघ किती रमला आहे

नयन त्याचे  शोध घेतात
फ़क्त तुझी दृष्टी
जणू म्हणतो की , तुला
पाहताच बहरेल माझी सृष्टी

राणी, तुझे हे वागणे
समजतच नाही कोणाला
ही प्रीती त्वरित
जुळउनी  यावी तुजला

विरहात  स्वतःला  तू
सावरून घे
चिमुकल्या त्या  क्षणाना
आपलेसे तू करुन  घे

क्षणोंक्षणी  या क्षणांची
शिदोरी तुला ठेवून घे
प्रेमाचे आलिंगन देऊन
सख्याचा तू निरोप घे

अग पुरे कर आता
अश्रुनी ओंजळही भरून जावी
रुसली कितीही जरी तू
ही भेट तुझी पुन्हा व्हावी !!!

                       

Shrikant R. Deshmane

nirop nav ya kavitesathi kharach sarth tharla...
agadi surekh kavita..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Madhura Kulkarni


swara

he mazi sarvat fav kavita ahe....
:)  :)

thanks shrikant
thanks madhura