स्वामि तिन्ही जगाचा आई वीणा भिकारी...

Started by Ankush S. Navghare, Palghar, December 11, 2012, 12:01:12 AM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

कधी कधी असे वाटते खुप खुप लहान व्हावे
चिमणीचे पंख घेऊन आकाशात उडावे
पण असे वाटते आता ते जमणार नाही
तु नसताना माझे मन आकाशात रमणार नाही...!!१!!

मी लहान असताना तु मला मायेने घास भरवायची
हा चिऊचा हा काऊचा म्हणून खोटे खोटे फसवायची
मला वाटते आता ते दिवस कधीच परतणार नाहीत
तु नसताना माझे मन आकाशात रमणार नाही...!!२!!

तुला वेळ नसायचा तरी शाळेत नेऊन सोडायची
आपल्या ह्या सोन्या साठी तु किती त्रास सोसायची
मला वाटते हे जगातील कोणालाही जमणार नाही
तु नसताना माझे मन आकाशात रमणार नाही...!!३!!

कधी मी आजारी असताना तु रात्र रात्र जागायची
माझे आजारपण दूर करून स्वतः आजारी पडायची
मायेच्या पंखाखाली मला किती हळुवार जपायची
आता कदाचित कधीच ती माया जाणवणार नाही
पण तु नसताना माझे मन आकाशात रमणार नाही...!!४!!

मला काही लागले की अश्रू तुझ्या डोळ्यांतून यायचे
अश्रून बरोबर मग तुझे प्रेम हि बरसायचे
आता वाटते ते प्रेम परत कधीच बरसणार नाही
पण तु नसताना माझे मन आकाशात रमणार नाही...!!५!!

माझे हात पकडून तु मला चालण्यास शिकविले
जगाच्या पाठीवर जगण्यास शिकविले
आता तुझ्या ह्या वयात मी तुला अंतर कधीच देणार नाही
पण तु नसताना माझे मन आकाशात रमणार नाही...!!६!!

मला अभिमान आहे तुझ्या पोटी जन्मण्याचा
मला अभिमान आहे की तु माझी आई असण्याचा
मायेची साथ मी तुझी सात जन्मातही सोडणार नाही
पण तु नसताना माझे मन आकाशात रमणार नाही...!!७!!

आता तु खुप थकली आहेस कष्ट करून दमली आहेस
माझे वचन आहे मी आता तुला कसलाच त्रास होऊ देणार नाही
पण तु नसताना माझे मन आकाशात रमणार नाही...!!८!!

आई तुझ्यावर लिहिले तर एक मोठे काव्यच बनेल
कोणीतरी म्हटले आहे...
स्वामि तिन्ही जगाचा आई वीणा भिकारी
ह्याची प्रचीती सर्व जगाला घडेल   
पण मी ह्या चार ओळींपेक्षा आता आणखी काही
लिहू शकणार नाही
तु नसताना माझे मन आकाशात रमणार नाही
तु नसताना माझे मन आकाशात रमणार नाही...!!९!!

.... प्राजुन्कुश
.... Prajunkush.

टीप :- सुरवातिच्या चार ओळी मला वाटते मी कुठेतरी ऐकल्या आहेत.



Shrikant R. Deshmane

hats off Prajunkushji ya kavitesathi...
thnks ki tumhi ashi kavita vachayla dilit aamhala...
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Ankush S. Navghare, Palghar

Shrikant sir, Madhura madam ani Prachi madam...
..... Khup abhar manapasun....
Pan hats off mla nahi tya vyaktila ahe jine mla kavi banavile....
Thanks..


Ankush S. Navghare, Palghar