लाचार (हाइकू)

Started by केदार मेहेंदळे, December 12, 2012, 12:56:18 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

विक्रांत, तुझ्या 'सत्तेची लॉटरी' ह्या कवितेवर आधारित एक हाइकू कविता.

सत्तेचा माज
काळ्या पैशाची साथ
भ्रष्ट पुढारी

आम आदमी
हाता तोंडाची गाठ
गांडूळं आम्ही

मतांचा वर
निर्मिले भस्मासुर
शंकर आम्ही


केदार.... 

'हाइकू' हा एक जापनीज कविता प्रकार आहे. ह्यात प्रत्येक कडवं ३ ओळींचं असतं. प्रत्येक ओळीत कितीही शब्द असू शकता मात्र पहिल्या ओळीत ५, दुसर्या ओळीत ७ आणि तिसर्या ओळीत ५ अक्षरां  पेक्षा जास्त किंवा कमी अक्षरं असू शकत नाहीत. जोडाक्षराला एक अक्षर मानायचं.   (३ ओळयांच  एक कडवं , एकूण अक्षरं १७.) अक्षर संख्या जपण्या साठी शब्द तोडायचा नाही. प्रत्येक ओळ वेगळी असायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक ओळीचा अर्थ त्याच ओळीत असायला हवा. ओळ तोडून दोन ओळी करायच्या नाहीत.

मजा येते. मी प्रयत्न केला आहे, तुम्ही हि प्रयत्न करून बघा. कमीत कमी अक्षरांत मोठा अर्थ कसा सांगायचा हि एक मजा आहे.

Madhura Kulkarni

मला नाही जमत एवड.....पण प्रयत्न करते,
कुठे चांदणी
कुठे आहे ग चंद्र
रात्र एकटी 

विक्रांत

sundar. keep it up.punha hayku vachayla lagel.Thanks

केदार मेहेंदळे

#3
अंधार दिशा
ढग आठवणींचे
विरह तुझा  :( 
 
काळोख नभी
ना चंद्र ना चांदनी
अंधार मनी  :(





Madhura Kulkarni

#4
अजून हायकू .......

मिटले डोळे
तूच तू स्वप्नातही
घे प्रीत ग्वाही

आज हरलो
पडलो प्रेमात ग
नकळत मी

केदार मेहेंदळे

GR8..... keep it up

majaa yeil...... kamit kami shabdaat kiti sangataa yet he jamal ki aschary vatat...

Madhura Kulkarni

ठीक आहे केदार दादा,
अजुन एक हायकू

कविता माझी
शब्द मात्र तुझेच
प्रेमगीत हे

केदार मेहेंदळे

ठेव जपुनी
शब्द शब्द हृदयी
प्रीत अपुली 

बाय द वे.....हे लाचार पासून बराच भरकटल..... नाही... :D

Madhura Kulkarni

Ok then, लाचार वरही करता येईल न हायकू.....

कश्यास देता
खोटी वचने वादे 
राजकारण

सुधार करू
भ्रष्ट हा नेता वदे,
उदाहरण!!!