हाइकू

Started by केदार मेहेंदळे, December 12, 2012, 01:34:31 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

'हाइकू' हा एक जापनीज कविता प्रकार आहे. ह्यात प्रत्येक कडवं ३ ओळींचं असतं. प्रत्येक ओळीत कितीही शब्द असू शकता मात्र पहिल्या ओळीत ५, दुसर्या ओळीत ७ आणि तिसर्या ओळीत ५ अक्षरां  पेक्षा जास्त किंवा कमी अक्षरं असू शकत नाहीत. जोडाक्षराला एक अक्षर मानायचं.   (३ ओळयांच  एक कडवं , एकूण अक्षरं १७.) अक्षर संख्या जपण्या साठी शब्द तोडायचा नाही. प्रत्येक ओळ वेगळी असायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक ओळीचा अर्थ त्याच ओळीत असायला हवा. ओळ तोडून दोन ओळी करायच्या नाहीत.

मजा येते. मी प्रयत्न केला आहे, तुम्ही हि प्रयत्न करून बघा. कमीत कमी अक्षरांत मोठा अर्थ कसा सांगायचा हि एक मजा आहे.

एक कडवं
केवळ तीन वाक्य
हाइकू काव्य

तीनच वाक्य
फक्त सत्रा अक्षरं
हाइकू काव्य

कमी अक्षरं
अर्थ भरला मोठा
हाइकू काव्य

लिहून बघा
अक्षरांची हि मजा
हाइकू काव्य  ;D


केदार...



Madhura Kulkarni

नवीनच प्रकार आहे हा 'हायकू'......चांगला प्रयत्न आहे काहीतरी नवीन करण्याचा.

Ankush S. Navghare, Palghar

Challenging job ahe... Masta.

विक्रांत

mi shirish pai yanchy hayku vachlya aahet.jara anght aahe.kavitechya pratek praytnache swagat aso.

amoul

vachayala maja yete......... ase suchalyavar hi khup maja yeil

ujwal deshmukh

मिळेना कुठे
भेटली मग शांती
स्मशानात ती ....


असे काव्य हे हायकू होऊ शकते का ?

ujwal deshmukh

छत्री धरून
पाऊस कासावीस
चंद्र स्पर्शास .....

असे पण होऊ शकते का हायकू