विसरू कसा?

Started by केदार मेहेंदळे, December 13, 2012, 12:50:18 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

आठवायचं नाही म्हंटलं तरी
विसरु शकत नाही तुला
कारण.................................
.............................................विसरण्या साठी सुध्धा
.............................................आठवावच लागतं तुला

आठवलं तुला कि
आठवतात भेटी आपल्या
अन..........................................
.................................................विसरून जातो कि
.................................................विसरायचं तुला

तूच सांग सखे
विसरू कसा तुला?
अगं.................................
.......................................तुझ्या शिवाय काही
......................................अठवणीच नाही मला

ह्या पेक्षा म्हणतो मी
आठवत राहतो तुला
निदान...................................
.............................................माझ्या बरोबर नाहीयेस तू
.............................................हे विसरायला होईल मला.



केदार....


Sandy_Love_Sau

केदार खूप छान..!

swara

khup chan rachali kavita sir
mast.......

supriya shinde

KHUP CHAN AHE KAVITA ANI KHARACH KHUP KATHIN AAST VISRAYLA

देवेंद्र

छान आहे केदार.... आणि तुम्ही म्हणता ते मान्य... विसरायच का?

Madhura Kulkarni

छान.....


रक्त बनुनी नसानसांत भिनलेल्या
हृदयात खोलवरती रुतून बसलेल्या ....

सांग सखे कसा तू केलास विचार असा, 
आठवणी तुझ्या मी विसरू तरी कसा ?

shrirang katti


shrirang katti


कवि - विजय सुर्यवंशी.

निदान................................................................................माझ्या बरोबर नाहीयेस तू .............................................हे विसरायला होईल मला..
.
.
.
.
nice kedar.

देवेंद्र

केदार, खरच खूप सुंदर लिहिलंय. परत एकदा वाचली ही कविता आणि परत सांगावस वाटतंय ... सुंदर !