आठवणीच्या पाऊलवाटा...

Started by Sandy_Love_Sau, December 13, 2012, 02:13:11 PM

Previous topic - Next topic

Sandy_Love_Sau


हळुवार जग कसं दूर सरु लागलं..
क्षणात सारकाही हरवून गेलं

आपल असलेलं आता आपल राहील नव्हत...
तरीही मन हे वेडं किती..
तुझ्यासाठी धावू लागलं

गेलीस निघून आयुष्यातून तरीही...
आठवणीच्या पाऊलवाटेवर एकटक वाट पाहू लागलं..

केदार मेहेंदळे