उध्वस्त अंगण माझे

Started by देवेंद्र, December 13, 2012, 05:07:08 PM

Previous topic - Next topic

देवेंद्र

उध्वस्त अंगण माझे
मीच सावरू कसे

तम रात्र जाळीत होता
निशब्द वारेही जसे
हुंद्क्यांसवे कुशीला
साथ आसवांची असे

तो वेळू स्तब्ध होता
जणू सूरच निमाले सारे
त्याच निळ्या आभाळी
मोकळा अंधार उरला होता

मन आक्रंदत होते
तरीही प्रलय ओसरेना
पैलतटावर सर्वस्व माझे
पण सेतू गवसेना

निश्चय अभंग आहे
स्वप्नेही जिवंत अजुनी
त्या नव्या पहाटेची
आस उरात आहे
          - देवेंद्र

केदार मेहेंदळे


किरण पवार

mast..

...त्याच निळ्या आभाळी
मोकळा अंधार उरला होता


Ankush S. Navghare, Palghar


manisha gaikwad


देवेंद्र

Dhanyawad mitranno...me he sagala kadhich kuthech share navata kela...tumhi wachun appriciate kelat ...bara watala...Thanks