का गेलीस निघून सखे

Started by देवेंद्र, December 14, 2012, 02:48:35 PM

Previous topic - Next topic

देवेंद्र

का गेलीस निघून सखे
मला एकटच सोडून

स्वप्नातल ते गाव
दूरच होत अजून
तिथल्या वाटांची
ओळख पण नव्हती

कोवळ्या फुलांनी अजून
रंगही नव्हता धरला
का अवेळीच त्यांना
शिशिर घेऊन गेला 

तुझ्या ओठांवरच हसू
अजून निटसं पाहिलही नव्हत
मी चंद्राला अजून
ओंजळीत घेतलही नव्हतं

चांदण्या रात्रींच्या आसवांच दान
तू पदरात घालून गेलीस
जाताना सखे फक्त 
आठवांना सोडून गेलीस

मैफील सुरूच नाही झाली
अन भैरवी का ग झाली
का अवकाशी विरून गेल्या
मालकंसाच्या ओळी

                     - देवेंद्र

swara

सुंदर रचना केलीस
मस्त .... :)  :)

मित्रा मनातलं दुःख
आज तू व्यक्त करुन घे.
सोसलेले दुःख थोडं
तिच्यासोबत वाटुन घे.
न बोललेले शब्द
आज तू सांगुन दे......



avi10051996

तुझ्या ओठांवरच हसू
अजून निटसं पाहिलही नव्हत
मी चंद्राला अजून
ओंजळीत घेतलही नव्हतं

........ वाह क्या बात है अप्रतिम

Madhura Kulkarni

वाह, प्राचू, मस्त ग.
आणि देवेंद्र , चांगला प्रयत्न आहे.

Ankush S. Navghare, Palghar


केदार मेहेंदळे