आठवण

Started by kavishrikul, December 16, 2012, 12:59:48 PM

Previous topic - Next topic

kavishrikul

 आठवण

चिमणी चोची मधे चारा  जेव्हा पिलाच्या घालते //  //
माझ्या डोळा येत पाणी आठवण आईची रे येते // ध्रु . //

बालपणी पदराला जिच्या धरून चाललो
तिची गावरान बोली मी  ही बोबडा बोललो
तिची अंगाई अजून रोज राती आठवते //
चिमणी चोची मधे चारा  जेव्हा पिलाच्या घालते // १ //

माझ्या सुखासाठी तिनं किती कष्ट सोसलेलं
राब - राबून उपाशी तिनं मला पोसलेलं
फुलवण्या बाग माझी स्वतः काट्यात नांदते //
चिमणी चोची मधे चारा  जेव्हा पिलाच्या घालते // २ //

नाही परतीची वाट गेली निघून ती दूर
डोळ्यातून गालावर वाहे आसवांचा पूर
क्षणं - क्षणं आईवीण माझं काळीज रडते //
चिमणी चोची मधे चारा  जेव्हा पिलाच्या घालते // ३ //

कोण करील कौतुक , कोण हट्ट पुरवील ?
ओल्या नजरेन कोण मला घास भरवील ?
व्याकुळले मन देवा तुला आज विचारते //
चिमणी चोची मधे चारा  जेव्हा पिलाच्या घालते // 4  //

माझ्या डोळा येत पाणी आठवण आईची रे येते //
चिमणी चोची मधे चारा  जेव्हा पिलाच्या घालते //

कवी - श्रीकुल , सचिन कुलकर्णी
रोपळे ( पंढरपूर ) जि . सोलापूर
मो . ९४०३२९३२३६ - ९०९६२५१२११

MK ADMIN

Kruapya title marathi madhye post kara...
I have edited this post...please take care from next time..Enjoy MK :)

केदार मेहेंदळे