कोजागिरीचा चंद्र ...

Started by Sadhanaa, December 17, 2012, 11:43:24 AM

Previous topic - Next topic

Sadhanaa

कोजागिरीचा चंद्र
        तळपतो आकाशी
मी मात्र बसतो
        झुरत माझ्या मनाशी ।
विरहाचे दुःख ते
         जाळीते मनमनाला
कंटाळलो आता ह्या
          एकाकी जीवनाला  ।
एक होती जीवनी
        पत्नी ती प्रेमळ
सोडून गेली ती
        अन राहिली हळहळ ।
जीवनांत प्रेम ते
       सोडून मला गेले
विरहांतील एकाकी
         जीवन हे फक्त उरले ।
तिच्या वाचून जीवन
          सारे उदास होते
पुनवेच्या चांदण्यांत
        आठवणी आभासांत
मन ते रंगून जाते
       अन् अवसेला सुद्धां
चांदणे फुलले वाटते ।
        त्यांच स्मृतिंवर
मी जगत आहे
       त्यांच उराशी घेऊन
एक दिवस जाणार आहे   ।
         अंतरीची तगमग
तेव्हांच थांबणार आहे
        कोजागिरीचा चंद्र मात्र
असाच तळपणार आहे ।।
रविंद्र बेंद्रे
ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://ravindrabendre.blogspot.com/2012/12/blog-post_12.html

केदार मेहेंदळे