क्षणापूर्वी हंसत होता ...

Started by Sadhanaa, December 18, 2012, 10:46:40 AM

Previous topic - Next topic

Sadhanaa

क्षणापूर्वी हंसत होता ...

क्षणापूर्वी हंसत होता
चारचौघांत बोलत होता
आठवणीत रमत होता
भावी स्वप्नें पहात होता।

मी,माझं याची जाणीव
मनांत न शब्दांत होती
नविन आणखी करण्याची
उमेद ही धरली होती।

वीज चमकावी तशीं
कुठून-कशी कळ आली
फडफडली जीवन ज्योति
अन गात्रे सारी थंड झाली।

अचानक तो निघून गेला
प्रेम-वैर सारे विसरून गेला
आप्तेष्ठ-मित्रांच्या मनांत फक्त
आगळीच हळहळ ठेवून गेला ।। रविंद्र बेंद्रे

ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://ravindrabendre.blogspot.com/2012/12/blog-post_13.html

amoul