उपेक्षित कर्ण

Started by amoul, December 19, 2012, 01:50:35 PM

Previous topic - Next topic

amoul

नाही सोबतीस कुणी मोकळे आकाश विस्तीर्ण,
माझ्या सोबत होता फक्त एक उपेक्षित कर्ण.

आकाश बांधण्याची ताकद मुठीत असता,
नशिबात केवळ उरला मुठभर मातीचा रस्ता.

पापण्यात ना मावणारी स्वप्ने किती विशाल,
वाट आंधळ्यांनी आखली घेऊन हाती मशाल.

धागा एक एक कर्तुत्वाचा होत असता जीर्ण,
फुटक्या चांदणीस सांगती जा फुलव आकाश पूर्ण.

माघारी पावलांवर शरमेचे ठसे थोडेसे,
उरात झोपून गेले स्वप्न कुणी वेडेसे.

म्हंटले सुर्यच जिंकीन चालून चार पावलांनी,
उमेदच निघून गेली गुपचूप चोर पावलांनी.

पत्करले हताश होऊन नियतीचे दास्य,
पाहताना आरश्यात बोचते विदारक हास्य.

अर्जुनाचे भय नसते कधीच कुण्या कर्णाला.
चाक मातीत रुतते हेच निमित्त होते हरण्याला.

...... अमोल


केदार मेहेंदळे

chan kavita aahe mitra... shevatach kadav tar farach chan aahe.

santoshi.world


Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]