कोण होती ती...???

Started by Ankush S. Navghare, Palghar, December 20, 2012, 01:38:14 AM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

कोण आहे ती ना नाव ना गाव
तरीही माझ्या हृदयावर का करत आहे घाव...!!१!!

आताच तर मी तिला पहिले
पाहता पाहता माझे डोळे एक क्षण
तिच्यावर स्तीरावले
काय सांगू तिला
कसे बोलू माझ्या मनातले भाव
तरीही माझ्या हृदयावर का करत आहे घाव...!!२!!

क्षणभर ची मैत्री क्षणभर चे प्रेम
कधी बदलेल काही नसतो नेम
म्हणूनच मी घेतोय जरा जपूनच
तिच्या मनाचा ठाव
तरीही माझ्या हृदयावर का करत आहे घाव...!!३!!

हळू हळू चोरून तिच्याकडे पाहतोय
पाहता पाहता का स्वतःला विसरतोय
माझे मलाच काळात नाही मी हे का करतोय
असे तर नाही की मी तिच्या प्रेमात पडतोय
असे जर झाले तर सर्व कठीण होऊन बसेल राव
तरीही माझ्या हृदयावर का करत आहे घाव...!!४!!

अरे अरे ती तर निघाली मला वाटते की आले तिचे गाव
आता मलाच सावरायला हवे स्वतःला आवरायला हवे
आणि परत पाहिलं कडवचं वेगळ्या तऱ्हेने लिहायला हवे
कोण होती ती मला महित नाही तिचे नाव अन गाव
तरीही माझ्या हृदयावर का करत होती घाव...!!५!!

.... प्राजुन्कुश
.... Prajunkush



vikas padwal


केदार मेहेंदळे


Ankush S. Navghare, Palghar