भिजलेली((fantasy - uncensored)

Started by केदार मेहेंदळे, December 20, 2012, 11:05:16 AM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

 विक्रांत,
तुझ्या 'भिजलेले पान' ह्या कवितेतली अवखळ पोर इथे पावसात भिजतेय बघ.
http://marathikavita.co.in/index.php/topic,10279.0.html?PHPSESSID=46f542505c60b41bc9be4af5bee7a451

अवखळ पोरीच्या
अवखळ अदा
सावळ्या अंगावर
पावसाचा मारा

भिजलेला पदर
भिजलेली साडी
भिजलेल्या पाठीवर
थेंबांची नक्षी

सावळ्या चेहर्यावर
निथळणारया  बटा
बटांमधून नागमोडी
पाण्याच्या धारा

नाजूक पायांनी
पाण्याशी मस्ती
गवताच्या पातीची
ओठांशी सलगी

सावळ्या अंगावर
भिजलेली चोळी
अप्सराच जणू
स्वर्गातून आली

बघून भिजणारी
सावळी  ओली  काया
अंगावर पेटल्या
ओल्या ओल्या ज्वाळा 

केदार...

विक्रांत

सुंदर कविता .शृंगारिक आहे, सुरेख आहे

SANJAY M NIKUMBH


Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

GANESH911


Swateja