हा जीव आता मुक्तीसाठी तडफडतोय...

Started by Ankush S. Navghare, Palghar, December 21, 2012, 12:49:29 AM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

मी अजूनही तिथेच आहे
जेथे तु मला सोडले होते
तु म्हणाली होतीस कुठेच जाऊ नकोस
मी आत्ता परत येते
आणि मग मीही तसेच केले होते
त्या क्षणापासून...
तुझ्या एका भेटीसाठी धडपडतोय
कधी येणार तु कधी सोडणार हे बंध
हा जीव आता मुक्तीसाठी तडफडतोय...!!१!!

कितीतरी दिवस गेले
क्षणांची तर गणनाच नाही
जिथे एक एक क्षण म्हणजे
जगण्यासाठी सर्वकाही
आता उरलेल्या अखेरच्या श्वासापर्यंत
तुझीच वाट पाहतोय
हा जीव आता मुक्तीसाठी तडफडतोय...!!२!!

प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस
कसा येतोय कसा जातोय
ह्या क्षणापाठी पुढचा क्षण तर येणार नाहीना
ह्या विचारानेच जीव घाबरतोय
आता पुढच्या क्षणाची
वाट पाहण्यास लाऊ नकोस
तुझ्याकडे सतत हेच मागणे मागतोय
हा जीव आता मुक्तीसाठी तडफडतोय...!!३!!

कधीतरी तुला माझी आठवण येईल
मग तुझेही मन आपल्या भूतकाळात जाईल
जरी आता तुझ्या मनात काही नसेल
तरी थोडे का असेना माझे प्रेम तुला दिसेल
हीच अशा सदैव करतोय
हा जीव आता मुक्तीसाठी तडफडतोय...!!४!!

तुला नसेल यावयाचे तर
वाऱ्याबरोबर निरोप दे
तुला स्पर्शलेल्या वाऱ्याचा
स्पर्श तरी घडू दे
तुझ्यात नाही तर आता
वाऱ्यातच विलीन होऊ दे
तुझ्याकडे हे आता शेवटचे मागणे मागतोय
हा जीव आता मुक्तीसाठी तडफडतोय...!!५!!

.... प्राजुन्कुश
.... Prajunkush



Ankush S. Navghare, Palghar