प्रश्न (fantasy - uncensored)

Started by केदार मेहेंदळे, December 21, 2012, 12:42:04 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

स्पर्शता ओठांनी ओठ
शोधू लागली जीभ जिभेस
चुंबनातले आनंद असे हे
समाधानानी मिटले नेत्र

...........................................ओठांनी जर ओठ चावले
...........................................मी तुझे अन तू माझे?
...........................................चुंबन घेतले कुणी कुणाचे?
...........................................तू माझे? कि मी तुझे?

स्पर्शता देहासी देह
घट्ट बिलगलो  दोघे आपण
मिठीतले आनंद असे हे
श्वासां मधुनी उठले वादळ 

...........................................कुरवाळत जर दोघे होतो
...........................................मी तुला अन तू मला
...........................................मिठी मारली कुणी कुणाला?
...........................................मी तुला? कि तू मला?

स्पर्शा मधले सुख असे हे
कोण देते अन घेते कोण?
स्पर्श सुखातले प्रश्न असे हे
उत्तर याचे देईल कोण?





केदार....

Shrikant R. Deshmane

स्पर्शा मधले सुख असे हे
कोण देते अन घेते कोण?
स्पर्श सुखातले प्रश्न असे हे
उत्तर याचे देईल कोण?

apratim kedarji...
purnataha ya kavitela prashna he nav sajesa aahe..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]