शेवटची स्पंदने ..

Started by किरण पवार, December 22, 2012, 12:15:01 AM

Previous topic - Next topic

किरण पवार

शेवटची स्पंदने ..
अन अडखळे श्वास जेव्हा
का आठवे मला
तुझा हसरा चेहरा तेव्हा..?
.
मला सोडून जाताना
माझे हसू घेऊन गेली होतीस..
या शेवटचा रडव्या क्षणी मात्र
तेच हसू चेहऱ्यावर सजवून आली होतीस..
.
नातलगांची लगबग
माझा अवती भवती दिसे..
अन त्या गंभीर चेहऱ्यांमध्ये
का तुझा ओठांवर हसे?
.
माझी अशी अवस्था बघून
तुला हसू आलं असेल..
जे होत तुझा मनी
ते साध्य झालं असेल..
.
जाताना मात्र
मी ही तुला हसूनच उत्तर देईन,,
मरण येईल माझा दारात
अन हलकेच त्याला कुशीत घेईन..
.
एक क्षण उसना मागेन
अन विचारेन त्याला..
जीने तुला पाठवलं
तो हाच का हसरा चेहरा सांग मला?
.
मरणही मग
हसूनच होकार देईल..
क्षणात मला जीवनाच्या ओंजळीतून
मरणाच्या मुठीत घेईल..
.
माझा श्वासाचे धागे
हळू हळू तुटत जातील..
अंधुक होत जाईल जग
अन डोळे ही हळू हळू मिटत जातील..
.
हसता हसता एक अश्रू
तुझा डोळ्यातून नकळत वाहील,,
माझे डोळे कायमचे मिटतील
अन जाता जाता तुझे 'ते' हसू माझा ओठावर राहील..
.

-किरण पवार

http://kiranpawar0108.wordpress.com/

केदार मेहेंदळे