हृदयांतरी ठेवलेली...

Started by Sadhanaa, December 23, 2012, 10:48:21 AM

Previous topic - Next topic

Sadhanaa

हृदयांतरी ठेवलेली...


हृदयांतरी ठेवलेली
     उफाळते आज स्मृति
होते व्यथित मन माझे
       पाहुनि ही कर्म गति ।
सहवासाचा सौभाग्याचा
रगेल रंगेल त्या स्वप्नांचा
मधूर कोमल तव गंधाचा
      मनांत लहरी त्या उठती ।
धीर न होतो वदण्याचा
मार तोंड दाबुनि बुक्याचा
सहन तो किती करावा
      झापडे घेऊन नेत्रांवरती ।
बंद पापणी स्वप्नीं येऊन
जातेस जेंव्हा मला भेटून
पहातो मोदे नयन उघडून
      तेंव्हा नेत्र फक्त जळजळती ।
अंधार्या त्या स्वप्नीं येऊन
भेटत जा गोड हसून
जगेन त्यांतच सुख मानुन
दुःख लपवूनि ह्या जगती ।।

रविंद्र बेंद्रे   
ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://ravindrabendre.blogspot.com/2012/12/blog-post_17.html

Ankush S. Navghare, Palghar

Khup hrudaysprashi kavita ahe. Ase vatate...
Mi je jagatoy...
... Tech vachatoy
Kshanabhar nahi dur....
.... Satat tichech magane magatoy.

Sadhanaa

#2
thank you..
sadhana

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]