चहा (हाइकु) (fantasy - uncensored)

Started by केदार मेहेंदळे, December 24, 2012, 05:14:43 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

ह्या थंडीच्या दिवसात जरा सकाळचा (हाइकु) चहा गरम गरम ...........  


गुलाबी थंडी
मिठीतली सकाळ
गरम चहा

स्पर्श ओठांचे
अंगावर रोमांच
वाफाळ चहा

मिठीत नग्न
लपेटली चादर
कोमट चहा

तापली गात्रे
शरीरावर ज्वाळा
निवला चहा

थंड फारशी
प्राणायाचं वादळ
सांडला चहा

मिठीत दोघं
थकवा अंगावर
परत चहा

गुलाबी थंडी
मिठीतली सकाळ
गरम चहा



केदार...


Ankush S. Navghare, Palghar



n.l.kshirsagar

फेसबुक माध्यम अबालवृद्धांसाठी  खुले आहे याचे भान  ठेऊनच तारतम्याने याठिकाणी प्रत्येक गोष्ट प्रसारित करणे योग्य वाटते.त्यातील भावार्थाची प्रतिक्रिया नंतरची ! माया,ममता, वात्सल्य,  प्रेम, राग, द्वेष,  भावनावेग. इ. अनेक विचार, भावना प्रत्येकाचे मनात कमी जास्त प्रमाणात असते, पण त्या अयोग्य ठिकाणी, अवेळी व्यक्त करणे बहुधा अनुचीतच वाटते. प्रतिक्रिया व्यक्त  करणा-यानी सुद्धा याचा जरूर परामर्श घ्यावा व आपले मत व्यक्त करावे

केदार मेहेंदळे

n.l.kshirsagar सर,
तुमची प्रतिक्रिया वाचली. पण तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे ते कळल नाही. नव रसा पैकी 'शृंगार' हा एक रस आहे आणि त्यात काही घाण, किंवा  किळसवाणं नाहीये. कारण असे निकष लावायचे तर अजंठाच्या लेण्यां  बघायला अबाल वृध्धांनि जायलाच नको .....नाही का?
माझ्या मते चूक भावना express करण्यात नाहीये तर त्या अस्थायी (चुकीच्या ठिकाणी) करण्यात आहे. हे सदर शृंगारिक कविते साठीच आहे आणि माझ्या कवितेच्या नाव पुढे मी already ((fantasy - uncensored) असे लिहिले आहे. तरीही जर कोणी वाचत असेल तर ती माझी चूक नाही. आणि कविता वाचून  जर का नसत्या सोवळ्या विचारांना तडा जात असेल तर त्याला दांभीकपणाच म्हणायला लागेल. आशां  दांभीकां साठी मी 'इतर कविता' ह्या सदरात उद्या 'दांभीक' हि कविता पोस्ट करीन. त्यावर तुमची प्रतिक्रिया अपेक्षित आहे.
मला वाटत कोणतीही साईट हि adults करताच असते. अस असताना जर १८ वर्षा खालील मुलं ती साईट बघत असतील तर ती चूक पालकांची आहे.
Anyways.... तुम्ही अभिप्राय लिहिलात ह्याचा अर्थ तुम्ही माझी कविता पूर्ण वाचली आहे. त्या बद्दल धन्यवाद.

केदार...

amoul

kedar mi hi tuzya barobar aahe.

aani kalakarane uchalalele paul mage ghyayache nasate.
bhumika kayam thev..........
aaj nahi tar udya accept hotilach.....

केदार मेहेंदळे


santoshi.world


केदार मेहेंदळे


GANESH911