काही क्षणांची भेट ...

Started by टिंग्याची आई..., December 27, 2012, 02:34:07 PM

Previous topic - Next topic

टिंग्याची आई...

मी टिंग्याच्या आत्याकडे गेले होते चार दिवस राहायला... नेमकं त्याच गावात माझ्या दीदीच्या दूरच्या पाहुण्यांचं लग्न होत... नेमक्या त्याच दिवशी मलाही पुण्याला निघायचं होत.... गाडी होती १२ वाजताची... दीदी माझ्यासाठी आली होती त्या लग्नाला..... अगदीच धावती भेट झाली आमची.... खूप दिवसांनी भेटलो होतो दोघी... छोटीशीच भेट पण खरच खूप बर वाटलं....


एका आईच्या दोन लेकी.... आज एकमेकीला भेटल्या...
गंगा जमुना हातात हात घालून आल्या.. अन दोघींच्याही डोळ्यात दाटल्या...
एक आली होती कोणाच्यातरी लग्नाला.. तर दुसरी नंदेकडे राहायला....
आज काहीही कारण चालल असत.. दोघींनाही भेटायला....

एकमेकींच्या पिल्लांना दोघींनीही.. डोळेभरून बघितलं...
खूप दिवसांनी भेटलेल्या मावशीला... पिल्लांनी पण लग्गेच ओळखलं...
आपल्या भाच्याला ताई.. "मावशी" म्हणायला लावत होती...
धाकटी नुसतीच ताईकडे..... कौतुकाने पहात होती....

खूप जुनं ताईच घड्याळ.. धाकटी अजूनही वापरत होती....
आज धाकटीनेच घेतलेली साडी.. ताई मुद्दाम नेसून आली होती....
पिल्लांना एकत्र खेळताना पाहून.. दोघी मावशा सुखावल्या...
आपण कधी भेटायचं..?? म्हणत दोघी कडकडून भेटल्या....

शब्द न्हवते.. नुसतं डोळ्यातलं पाणीच बोलत होतं...
सासुरवाशनिला बहिणीच्या मिठीत.. जणू माहेरच सापडलं होतं...
बोलायचं खूप काही होत.. पण दोघी नुसत्याच बघत होत्या...
घळघळ अश्रू वाहत होते.. आणि खळखळून हसतही होत्या....

काहून रडती या लेकुरवाळ्या.. प्रश्न पडे लोकांना...
कोणाला काही वाटो.. आज फक्त पोटभरून भेटायचं होत त्या दोघींना....
तिकडे आईच्याही पापण्या.. उगीचच ओल्याचिंब झाल्या होत्या...
घरट्यात नसल्या.. तरी तिच्या चिमण्या आज एकत्र आल्या होत्या...

इन मीन दहा मिनिटांची भेट.. तासभर गप्पा त्या कुठल्या....??
आता परत भेट कधी ..? म्हणत पुन्हा एकदा दोघी कडकडून भेटल्या... :(
आता नेहमीसारखेच पुढेही... facebook वर नुसतेच फोटो पाठवायचे...
फोनवरच्या गप्पांमध्ये.. या गोड भेटीतले क्षण पुन्हा पुन्हा आठवायचे...

अवघ्या काही क्षणांचीच भेट... पण खूप काही देऊन गेली...
आठवणींची छोटीशी शिदोरी.. दोघी बहिणींनी आपल्या सोबत नेली...

- टिंग्याची आई Shailja :)
http://tingyaachiaai.blogspot.com/2012/12/blog-post_25.html

केदार मेहेंदळे