जीवन एक गाणे

Started by केदार मेहेंदळे, December 28, 2012, 01:38:59 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

रवींद्र जी,
तुमच्या जीवन एक कोडे  ह्या कविते वरून सुचलेली "जीवन एक गाणे" कविता (थोडी positive)


जीवन हे एक गाणे आहे
कधीही  न संपणारे
जीवन एक फुल आहे
सतत उमललेले

जीवन हे धूप आहे
प्रसन्न सुवास पसरवणारे
जीवन हे मेण आहे
मऊ मुलायम विरघळणारे

जीवन हे प्रेम आहे
जगायला लावणारे
व्यवहारी जगातही
आपलेपण टिकवणारे

जीवन हे स्वप्न आहे
हव ते दाखवणारे
जाग येताच त्या ध्यासानी
धावायला लावणारे

जीवन हे आभाळ आहे
विशाल पसरलेले
क्षितिजावर कायम
इंद्रधनू पसरलेले.


केदार...

Sadhanaa

फारच छान बोल आहेत  ...keep it up...
Sadhana