कधीही दुखवायचे नसते...

Started by Ankush S. Navghare, Palghar, December 28, 2012, 11:46:37 PM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

कवितेला काही आकार नसतो
ती हवी तशी वळणे घेत असते.
असे नाही की तिने फक्त
एकाच लयीत धावायचे असते...

कधी कविता प्रेम तर
कधी तिरस्कार घेऊन येते
कधी आनंद तर
कधी दुखातही लोटून देते...

एकाच विषयी असाव्यात कविता
असा काही नियम नसतो
ज्याच्या त्याच्या मनाचा अन
भावनांचा तो प्रश्न असतो...

कवितेला असावेत अनेक रूप रंग
कधी होकार तर कधी प्रेमभंग
पण नेहमी ध्यानात असावे की
तिने करूनये
एका नेमून दिलेल्या सीमेचा भंग...

प्रत्येक कविता हि
कुठलातरी विषय घेऊन येत असते
काही काळ ओरडून
काळाच्या पडद्याआड जात असते...

माझ्या कविता ह्या अशाच आहेत
त्यांना कुठलाही आकार नाही
त्या माझ्या मनाचा आरसा आहेत
आणि कोणाच्यातरी आठवणींचा वारसा आहेत...

म्हणून मित्रानो एकच सांगणे आहे तुम्हाला
तुमची कविता कशीही असो
अगदी तिला काही अर्थ असो अथवा नसो
पण ती नेहमी तुमचीच असते
तुमच्या आत्म्याचाच अंश असते
म्हणून जरी कुणीही
नाही केले तिच्यावर प्रेम
तुम्ही मात्र तिला
कधीही दुखवायचे नसते...
कधीही दुखवायचे नसते...

.... प्राजुन्कुश
.... Prajunkush.

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

केदार मेहेंदळे


Ankush S. Navghare, Palghar

Shrikant ji... Kedar sir...
... Khup abhar agadi manapasun.
Happy New Year 2013.