'तिचा’ म्रुत्यू झाला तेव्हा...

Started by sachin_sawant, December 30, 2012, 12:19:10 AM

Previous topic - Next topic

sachin_sawant

मांडलेल्या जिंदगीच्या बाजारात माणुसकी महाग झाली
    वासनेच्या चितेत नीतीमत्ता सती गेली

वखवखलेल्या लांडग्यांच्या गराड्यात
   अब्रु आक्रोश करीत होती
सारवासारव करीत खादी
  निषेधाच्या पॊकळ थडग्यात सुरक्षित होता

'तिचा' म्रुत्यू झाला तेव्हा...

अशा द्रौपदींच्या न्यायासाठी क्रुष्ण युवा होवून उसळला
     कारण लोकशाहीच्या वटव्रुक्षाखाली
         कायदा संन्यास  घेवून बसला होता

'तिचा' म्रुत्यू झाला तेव्हा...

केदार मेहेंदळे

#1
far sundar rachanaa....... angaavar shahaare aale.

Shrikant R. Deshmane

Sachinji..
Apratim kavita sadar kelit..
Hats off to u..
Asha kavita vachun tr rakta sal-salala pahije...
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]