क्रश कोर्स: बाबा बनायचा

Started by विक्रांत, January 01, 2013, 12:39:22 AM

Previous topic - Next topic

विक्रांत

देव देव करता जावे
आपण हळूच देव होऊन
मग घुमावे जगा म्हणावे
"याहो अवघे भक्त होऊन" १
"तुम्हा उद्धारीन धनिक करीन
पापे पचवीन आणि तारिण
काय हवे ते तुम्हा देईन 
पहा सर्वत: काळजी घेईन" २
थोडी फार दाढी वाढवावी
थोडी समोर आग जाळावी
कपडे भगवी कुत्री पाळावी
ताठ बसायची कळ सोसावी ३
येणाऱ्याला म्हणावे "तू आला?
छे, तुला तर मीच आणला "
जाणाऱ्याला म्हणावे "तू जातो ?
अरे, तुला मी हाकलून देतो"४
मर्जी धानिकावरी दाखवावी
भुरळ गोड शब्दाची पाडावी
गरीबा दाखवा सहानुभूती
पसरवतील ते तुमची कीर्ती ५
बोलावे "वेद असे म्हणाले ,
गीतेत तमके चुकीचे दिले
खरतर ते मीच लिहिले
काळ प्रवाही थोडे बदलले"६
विभूती लावा दोरा बांधावा
गुणकारी तो किती सांगावा
विरक्तीचा आव आणावा
पण दानाचा पेटारा ठेवावा ७
नेहमीच मोघम बोलावे
द्वीअर्थी अन उत्तर द्यावे
बिंग फुटले तरी न डरावे
पाहिली परीक्षा म्हणावे ८
जो जे देईल तो ते घ्यावे
कधी प्रयोग जादूचे करावे
शिष्य नाटकी जर मिळाले
तर मग सोन्याहून पिवळे ९
भूत काढावे मंत्र म्हणावे
कुणास किचकट व्रत द्यावे
जर झाले तर मीच केले
न होईल तर तुमचे चुकले  १०
जर अपघाती कुणी वाचला
तर म्हणावे मी वाचवला
पण जर का कुणी मेला
तर मग प्रश्नच सुटला ११
असे निगरगट्ट व्हावे
झुकती दुनिया झुकावावे
आइते मस्त बसून खावे
इहलोकीच मुक्त व्हावे १२

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/












केदार मेहेंदळे



santoshi.world

hihihihihihi  :D .......... mala aadhi vatal hi bhakti kavita ahe mhanun tya vibhagat move keli.. suruvat interesting vatali mhanun purna vachun kadhali  ;D ........... i think hi vinodi kavita jast suit hote ............ MK admin la vinodi kavita madhye move karayala sangate ... ...mast lihili ahe ha ................ keep writing n keep posting :)

केदार मेहेंदळे


विक्रांत

धन्यवाद ,santoshi विनोदाच्या अंगाने केलेली  टीकात्मक ,उपहासात्मक कविता  आहे. हसणे हसविणे असल्याने विनोदी मध्ये टाकली तर चालेल

durga