तु आणी पाऊस

Started by GANESH911, January 02, 2013, 01:50:31 PM

Previous topic - Next topic

GANESH911

तु आली तेच आकाशात काळे ढग घेऊन
माझ्या मनावर मळभ पसरवण्यासाठी

पाऊस मग नुसता पडत राहीला, आणी
चिखल माजवित राहीला

त्या पावसाच वागणही तुझ्यासारखंच लहरी
आपल्याच धुंदीत बरसत राहीला तो तुझ्या शब्दबाणांसारखा

ते पाऊसपाणी वाहुन नेऊ लागले मग सर्व प्रेम आठवणी
तसाच मीही वाहत राहिलो तुझ्या नव्या रुपात

तुझ्या माझ्या वाटा वेगळ्या झाल्याचं तु बोलली
पण पाऊस ईतका झाला कि सारं धुसुर दिसलं

ओंजळीत आता पाणी टिकलंच नाही,क्षणभंगुर नात्यासारखं
तु आणी मी मग तसेच भिजत राहीलो

तु निरोप घेतला परत कधी न येण्यासाठी,मी तसाच भिजत राहिलो
थोडॆ अश्रु आले पण तुझ्या पावसात एकरुप झाले न दिसण्यासाठी

काळ बराच लोटला पण तुझ्या पावसाचे शिंतोडॆ तसेच राहीले मनावर
तुझा तो पाऊस दरवर्षी येतो आणी मला हिणवतो
पण आता त्यात भिजण्याची माझी हिंमत होत नाही.

गणेश शिवदे

केदार मेहेंदळे

थोडॆ अश्रु आले पण तुझ्या पावसात एकरुप झाले न दिसण्यासाठी


chan

GANESH911


Prashant M. Patil


GANESH911

धन्यवाद प्रशांत, मनापासुन  :)