लावण्य़ आले जगी

Started by GANESH911, January 02, 2013, 04:19:59 PM

Previous topic - Next topic

GANESH911

नक्षत्र ल्याली ती लावण्यखणी
झणकारती सुर तिचे नाद लावुनी

रुणझुण ते पाऊल तिचे माझ्या अंगणी
जन्माची प्रीत माझी प्रेमसाजणी

पुष्पांचा गंध फिका तिजवाचुनी
अप्सरा ही आली जशी स्वर्ग सोडुनी

चंद्राची कोर कि ती धुंद चांदणी
जगण्याची ओढ मिळॆ तिजपासुनी

चाफेकळी रुप तिचे दाटते मनी
उधळे सुवास जसा चंदनातुनी

माया ती पसरी कि ती टाकी मोहिनी
लावण्य आले जगी तिच्यापासुनी

गणेश शिवदे

केदार मेहेंदळे


GANESH911