कधी

Started by GANESH911, January 02, 2013, 04:26:53 PM

Previous topic - Next topic

GANESH911

कधी शितल गारवा,कधी रणरण उन
कधी सुखसमाधान,कधी कासावीस मन

डोळे भरु वाही कधी,कधी कोरडॆ लोचन
कधी गती कधी स्तब्ध,नाव याचेच जिवन

प्रेम भरी कधी उरी कधी शल्य दाटी उरी
कधी फाटके शरीर,कधी देह भरजरी

कधी गजबज दारी,कधी घरे सुनसान
कधी क्लेषाचे दगड,कधी फक्त गुणगाण

कधी शिशीर तडाखा,कधी वसंत बहार
कधी ओंजळ रिकामी,कधी ओसंडुन धार

कधी सारे जण सखे,कधी सोड्ते सावली
कधी अनाथ जिवन ,कधी भेटते माऊली

कधी सर्व सुख भाळी,कधी काळोख जिवनी
कधी राहते अधुरी,कधी सुफळ कहानी


गणेश शिवदे

केदार मेहेंदळे


GANESH911