बस मधली "ती"

Started by GANESH911, January 02, 2013, 04:52:46 PM

Previous topic - Next topic

GANESH911

बस मध्ये प्रवास करत असतांना " तिला " बघुन सुचलेल्या काही ओळी कविता रुपात....आवड्ली तर जरुर कळवा...

ती गाडीत चढ्ली
गाडी मग ढळली
शांत एका सुरात

सिटवर ती बसली
छान थोडी हसली
हवा वाहीली जोरात

तिकीटे त्याने फाड्ली
सर्वांनी पैसे काढली
उरलेले सुटे खिशात

तिला मी पाहिली
जादु थोडी वाहिली
धडधड वाढली उरात

ती पुन्हा हसली
मला वाटलं फसली
मी आपल्याच तोरात

ती थोडी बोलली
मला बघुन फुलली
आता मी तिच्या प्रेमात

गाडी जशी उड्ली
मला पंख जोड्ली
प्रेमपाखरु गगनात

ती माझी झाली
हसु आले गाली
मस्त वाटले स्वप्नात


गाडी मग थांबली
पंख माझी झड्ली
आलो परत वास्तवात

ती खाली उतरली
न बघता चालली
सगळं मुसळ केरात

गणेश शिवदे

केदार मेहेंदळे

ha ha ha :D

prem kavita aahe? ka Virah kavita.....

GANESH911

kharetar,hya kavitelaa virah kavitach mhanayalaa havee :D dhanyawad ,kedarji