आई ला अर्पण

Started by nayana.kanitkar, January 02, 2013, 05:13:26 PM

Previous topic - Next topic

nayana.kanitkar

 
जीवनाच्या या क्षणाला
मी फक्त 'मीच' असावे
नको तो शिक्कामोर्बत
नांव किंवा अण्णावाचां
नको तो जात-पात वा धर्माचा
नको अता ते दिर्घ-र्ह्स्व
आता फक्त 'मीच' असावे
नको अता ती आई वा
पत्नी च्या कर्तव्या ची धांव
नको अता ते ऋणानुबंध
नको ती संपत्ति व माया
साठीच्या घरात पाऊल ठेवता
मी फक्त 'मीच' असावे
खूप अनुभवले सुखाचे क्षण
कष्ट आणी कामाचे पण
जगता आगळे आयुष्याचे क्षण
मी फक्त 'मीच' असावे

केदार मेहेंदळे


विक्रांत

विषय वेगळा आहे पण क्षमस्व ,
कवितेत विषयांतर नको व्हायला .जात-पात वा धर्माचा हा १ वेगळा मुद्दा आहे. नको अता ती आई वा.. हा खूप वेगळा  २ रा व साठीच्या घरात पाऊल ठेवता हा ३ रा  .त्या मुळे मीच' हा धागा तुटतो.
लेखन शुभेच्छा.

Shrikant R. Deshmane

nayanaji pratna chan aahe tumcha..
ha pan tumhala ajun khup sarya kavita post karaychyat..
best luck pudhchya pravasasathi...
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

nayana.kanitkar

#4
विक्रांत जी
मला वाटते धागा कुठे ही तुटलेला नाही कारण पन्नाशि उलटल्या वर से एका बाई ची मानसिकता काय असते तो लिहिण्याचा प्रयत्न आहे हा.कारण सगळे कर्तव्य पार पाडल्या वर ती अतिशय दमलेलि असते तेव्हा तिला धर्म जात-पात ,नांव किंवा अण्णावाचां चा सिक्का नकोसा होतो.हे अनुभव मांडण्याचा हा प्रथम मराठीतला प्रयोग होता.तरी आपल्या टिप्पणी ला मी अन्यथा घेतले नाही.वृहन महाराष्ट्रात राहुन शिकुन ही हा मरठी ला जपण्याचा प्रयत्न आहे.पुढे वाढण्यास आपला सहयोग असावा ही अपेक्षा.

विक्रांत

माफ करा ,लिहलेले आवडले नसेल तर .पुन्हा कविता वाचली ,मला अशी व्यक्ती कधी भेटलीच नाही.म्हणून गैरसमज झाला . :-[ :( >>>>>>>वृहन महाराष्ट्रात राहुन शिकुन ही हा मरठी ला जपण्याचा प्रयत्न आहे>>>>>>पुन्हा कळले नाही .पुन्हा माफ करा :-X :(

केदार मेहेंदळे

Nayanaji  Maharashtrat rahat nahit.... ani tya hindit kavita karatat.... If I am not misteking Nayan ji.