एकटाच चालण्याची ही वाट आहे

Started by GANESH911, January 02, 2013, 05:37:11 PM

Previous topic - Next topic

GANESH911

भिजवुन टाक रात्र आसवांनी सारी
उद्या पुन्हा नवी पहाट आहे

सोबतीला नसेल कुणी तर चाल एकटा
एकटाच चालण्य़ाची ही वाट आहे

शब्दांचे उष्ण शिसे वितळुन जाता कानी
सोसुन ऎक सारे जरा, तु धीट आहे
एकटाच चालण्याची ही वाट आहे

ना कुणी असे तुझा इथे, सावलीच फक्त आपुली
काळॊखाला सोड जरासा पुढे साराच थाट आहे
एकटाच चालण्य़ाची ही वाट आहे

आपलाच हात हाती घेऊन धाव जरासा
उर फुट्णार तरी कसा, रस्ता सपाट आहे
एकटाच चालण्याची ही वाट आहे

दे साद अशी जी पोहोची आकाशाला
विजांपेक्षा मोठा तुझा झगमगाट आहे
एकटाच चालण्याची ही वाट आहे

गणेश शिवदे

amoul

kya baat hai........ sudar kharach sundar

दे साद अशी जी पोहोची आकाशाला
विजांपेक्षा मोठा तुझा झगमगाट आहे

hya oli khup aavadalya

GANESH911


केदार मेहेंदळे


GANESH911





मिलिंद कुंभारे


ना कुणी असे तुझा इथे, सावलीच फक्त आपुली
काळॊखाला सोड जरासा पुढे साराच थाट आहे
एकटाच चालण्य़ाची ही वाट आहे

मित्रा खूपच छान कविता आहे!
क्या बात है!

मिलिंद कुंभारे