तु ठरव

Started by GANESH911, January 02, 2013, 06:27:33 PM

Previous topic - Next topic

GANESH911

तुझ्या ओल्या मातीला मी सांभाळुन ठेवीन
पण तु ठरव त्याला कुठला आकार असावा

तुझ्या फुलझाडांना मी खतपाणी घालेल
पण तु ठरव त्यातुन कुठला सुगंध सुटावा

तुला चित्रांचे रंग मी आणुन देईन
पण तु ठरव कुठला रंग कशात भरावा

मी सारे मिळवुन देईन तुला
पण तु ठरव या सर्वांचा अर्थ काय निघावा

मी कधी ना बोलणार ना म्हणनार तुला
पण तु ठरव कि याचा शेवट कशात व्हावा

मी असेन किंवा नसेन कधी
पण तु ठरव खेळ जिंकावा की हरावा

पण एवढेच सांगणे असेन बाळा
यंत्रांच्या दुनियेत तु माणुस म्हणून जगावा



गणेश शिवदे

केदार मेहेंदळे


Shrikant R. Deshmane

surekh kavita...
yach kaviteche thode shabda change kele ter hich kavita ek prem kavita banun jail...
masta..
go on ganeshji..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

GANESH911

dhanyawad kedar sir,shrikantji ...@shrikantji---apli suchna aavadli....mala vatate aapan asa prayatna karu shakata ,mala te nakkich avadel